बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्या बारा पान टपरी चालकांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्या बारा पान टपरी चालकांवर कारवाई
बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्या बारा पान टपरी चालकांवर कारवाईभारत नागणे

पंढरपूर - विनापरवाना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या पंढरपूर शहरातील 12 पान टपऱ्यांवर आज अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 32 हजार रुपयांचा गुटखा व तत्सम मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बारा जणांवर पंढरपूर Pandharpur शहर पोलीस ठाण्यात Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्या बारा पान टपरी चालकांवर कारवाई
BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत

विनापरवाना प्रतिबंध असलेल्या गुटखा व पानमसाल्यांची पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार आज अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पंढरपूर शहरात कारवाई केली. कारवाईदरम्यान बारा पान टपऱ्यांमध्ये प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले असून यामध्ये सुमारे 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित बारा पान टपऱ्या सील केल्या असून चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com