अंबरनाथच्या भिंत दुर्घटनेला जबाबदार ठेकेदारावर कारवाई करा - रवींद्र चव्हाण

घटनास्थळी भेट देत घेतला परिस्थितीचा आढावा
अंबरनाथच्या भिंत दुर्घटनेला जबाबदार ठेकेदारावर कारवाई करा - रवींद्र चव्हाण
अंबरनाथच्या भिंत दुर्घटनेला जबाबदार ठेकेदारावर कारवाई करा - रवींद्र चव्हाणअजय दुधाणे

अंबरनाथ - अंबरनाथमधील भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर आणि सबकॉन्ट्रॅक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी आज घटनास्थळी घेऊन या दुर्घटनेचा आढावा घेतला.

अंबरनाथच्या गॅस गोडाऊन परिसरात अवघ्या तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या उद्यानाची संरक्षण भिंत उद्यानाच्या मागील बाजूला असलेल्या घरांवर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसात घडली होती. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं.

हे देखील पहा -

या घटनेनंतर भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज घटनास्थळी येऊन या दुर्घटनेचा आढावा घेतला. तसंच मृताच्या कुटुंबीयांचीही भेट घेत दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली. यानंतर अंबरनाथ नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत या दुर्घटनेप्रकरणी त्यांना धारेवर धरलं. संबंधित उद्यानाचं काम हे १० लाख रुपयांच्या आमदार निधीतून अभ्यासिकेच्या नावाखाली करण्यात आलं असून संरक्षक भिंतीचं काम हे अतिरिक्त १० लाख रुपयांच्या नगरपालिकेच्या निधीतून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता. त्यामुळे या भिंतीचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. तर मृताच्या लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही भाजपची असेल, असंही रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं.

अंबरनाथच्या भिंत दुर्घटनेला जबाबदार ठेकेदारावर कारवाई करा - रवींद्र चव्हाण
रस्ता दिल्या शिवाय मृतदेह उचलनार नाही, गावकऱ्यांचा पावित्रा

अंबरनाथ शहरात कॉन्ट्रॅक्टर वेगळा असतो आणि प्रत्यक्ष काम सब कॉन्ट्रॅक्टर करतो, ही पद्धत अतिशय चुकीची असून यामध्ये कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा मलिदा घेऊन वेगळा होतो. त्यानंतर सब कॉन्ट्रॅक्टर देखील स्वतःचा मलिदा वेगळा काढण्याच्या नादात विकास कामं ही अतिशय निकृष्ट दर्जाची होतात, असा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी या कामाचे कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह कामाची देखरेख करणारे अंबरनाथ नगरपालिकेचे इंजिनियर या सर्वांवर फौजदारी कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com