ST कर्मचार्‍यांवरील कारवाई सुरुच; दिवसभरात 238 जणांची सेवा समाप्ती

आजच्या निलंबित कर्मचाऱ्यांसह (suspended staff) राज्यात जवळपास 2776 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ST कर्मचार्‍यांवरील कारवाई सुरुच; दिवसभरात 238 जणांची सेवा समाप्ती
ST कर्मचार्‍यांवरील कारवाई सुरुच; दिवसभरात 238 जणांची सेवा समाप्ती SaamTV

रश्मी पुराणीक -

मुंबई : राज्यभरात ठिकाणी सुरू असलेला ST कर्मचाऱ्यांचा संप (ST workers strike) दिवसेंदिवस चिघळतच आहे. अशातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Transport Corporation) नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्या कारणाने संपकरी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावरती रुजू व्हावे अन्यथा निलंबन करु असं सांगण्यात आलं होतं.

हे देखील पहा -

तसेच कामावरती रुजू होणार्‍या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची तयारी देखील एसटी महामंडळाने तयारी दाखवली आहे. तरिही कामावरती रुजू न झाल्याने आज जवळपास 297 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

ST कर्मचार्‍यांवरील कारवाई सुरुच; दिवसभरात 238 जणांची सेवा समाप्ती
'मृत्यूचा बदला घेणार'.. पोलिसांच्या कारवाईनंतर नक्षल्यांची पहिलीच प्रतिक्रिया

आजच्या निलंबित कर्मचाऱ्यांसह (suspended staff) राज्यात जवळपास 2776 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ST तील 238 कर्मचार्‍यांवर आज सेवा समाप्तीची कारवाई आज दिवसभर 2296 पैकी 238 रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून उद्या आणखी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्‍यांवरही सेवा समाप्तीची कारवाई (Service termination action) सुरू राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एसटी महामंडळाचे आजही कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन कामावर रुजू होणार्‍या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण (Police protection) देण्याचीही एसटी महामंडळाचे (ST Corporation) तयारी दर्शवली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com