Zilla Parishad News: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उडाली खळबळ; बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जाेडणारे 52 शिक्षक निलंबित

या सर्व शिक्षकांची विभागीय चौकशीही लावण्यात आली आहे.
beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawar
beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawarsaam tv

Beed Zilla Parishad News : बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या बावन्न शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई बीड जिल्ह्यात झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (CEO Ajit Pawar) यांनी हे आदेश काढले आहेत. या कारवाईमुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईमुळे बीडच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawar
Child Marriage : अल्पवयीन मुलीशी लग्न? पाेलिस दलात खळबळ; छळाप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

बीड (beed) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या (teachers) ऑनलाईन प्रणालीव्दारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात 1572 शिक्षक पात्र होते. यातील 794 शिक्षकांनी आपण संवर्ग एकमध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले. (Breaking Marathi News)

संवर्ग एकमध्ये गंभीर आजारी, दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा (school) मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने सीईओ अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची सुनावणी घेतली. यात 336 दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देवून तपासणी करण्यात आली. 336 शिक्षकांना पुर्नतपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामनंदतीर्थ वैद्यकिय शासकिय महाविद्यालय या शिक्षकांची सुनावणी घेतली.

beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawar
Chandrashekhar Bawankule News : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीवरुन चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर बरसले

दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये आणि दिव्यांग प्रमाणपत्र पुर्नतपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळुन आली. या तफावतीवरूनच 248 पैकी 52 शिक्षक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सीईओ अजित पवारांनी यांनी 52 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

तसेच त्यांची विभागीय चौकशीही लावली आहे, या चौकशी नंतर त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जाणार आहे, त्यामूळे खळबळ उडाली.दरम्यान आणखी 88 शिक्षकांचा अहवाल येणे बाकी असून त्यामध्ये 20 ते 25 बोगस प्रमानपत्रावाले शिक्षक मिळतील. अशी माहिती सीईओ अजित पवार यांनी दिली.

beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawar
Sindhudurg Fort : साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर "धिंगाणा"; महिलांना चाेपलं अन् नंतर...

कारवाई झालेल्या बोगस शिक्षकांची नावे

धनंजय गोविंदराव फड (अंबाजोगाई, अल्पदृष्टी), रविकांत सुधाकर खेपकर (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), अशोक वामनराव यादव (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), चिंतामन तुकाराम मुंडे (अंबाजोगाई, अस्तिव्यंग), राजू शंकर काळे (आष्टी, कर्णबधीर), वर्षा रामकिसन पोकळे (आष्टी, कर्णबधीर), राजेंद्र शिवाजी हजारे (आष्टी, कर्णबधीर), अमोल कुंडलिक शिंदे (आष्टी, अल्पदृष्टी), आनंद सिताराम थोरवे (आष्टी, अस्तिव्यंग), मनिषा उत्तमराव धोंडे (आष्टी, अस्तिव्यंग), देविदास भानूदास नागरगोजे (केज अल्पदृष्टी), आसाराम पांडूरंग धेंडूळे (गेवराई, अल्पदृष्टी), रमेश ज्ञानोबा गधे (गेवराई, अल्पदृष्टी), हनुमान यशवंत सरवदे (गेवराई, अल्पदृष्टी), सुधाकर दगडू राऊत (गेवराई, अस्तिव्यंग), अरूण भिमराव चौधरी ( गेवराई, अस्तिव्यंग), महादेव सखाराम जाधव (गेवराई, अस्तिव्यंग), मनोजकुमार अशोक जोशी (गेवराई, अस्तिव्यंग), मनोजकुमार मधुकर सावंत (गेवराई, अस्तिव्यंग), अनिता गोविंदराव यादव (गेवराई, अस्तिव्यंग), अर्चना भगवान इंगळे (धारूर, अस्थीव्यंग), शांताराम भानूदास केंद्रे (परळी, अल्पदृष्टी), मनोज नरसिंगराव सुर्यवंशी (परळी अल्पदृष्टी), दिपक भालचंद्र शेप (परळी, अल्पदृष्टी).

कारवाई झालेल्या बोगस शिक्षकांची नावे

जानदेव नवनाथ मुटकुळे (पाटोदा, अल्पदृष्टी), गणेश भागवत ढाकणे (पाटोदा अल्पदृष्टी), पांडूरंग आबासाहेब गवते (बीड, कर्णबधीर), शितल शहादेव नागरगोजे (बीड, कर्णबधीर), स्वाती चंद्रसेन शिंदे (बीड, कर्णबधीर), भारती मुरलीधर गुजर (बीड कर्णबधीर), अंबिका बळीराम बागडे (बीड, कर्णबधीर), विमल नामदेव ढगे (बीड, कर्णबधीर), जिवन रावसाहेब बागलाने (बीड, कर्णबधीर), शोभा अंबादास काकडे (बीड, कर्णबधीर), वनमाला देविदास इप्पर (बीड, कर्णबधीर), आश्रूबा विश्वनाथ भोसले (बीड, अल्पदृष्टी), राजश्री रघुवीर गावंडे (बीड, अल्पदृष्टी), वाजेदा तबसुसुम मोहम्मद शफीउद्दीन (बीड, अल्पदृष्टी).

beed, teacher, beed zilla parishad, ceo ajit pawar
Pune-Bangalore National Highway : खंबाटकी घाटात दाेन ट्रकचा अपघात; जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

कारवाई झालेल्या बोगस शिक्षकांची नावे

शैला नागनाथ शिंदे (बीड, अल्पदृष्टी), रतन अंबादास बहिर (बीड, अल्पदृष्टी), दतू लक्ष्मण वारे (बीड, अस्थिव्यंग), बंडू किसनराव काळे (बीड, अस्तिव्यंग), चाँद पाशा महेबूब शेख (बीड, अस्तिव्यंग), उज्वला अशोक जटाळ (बीड, अस्तिव्यंग), आयशा सिद्दीका इनामदार (बीड, अस्तिव्यंग), ज्योती लहूराव मुळूक (बीड, अस्तिव्यंग), अंजली प्रभाकर भोसले (बीड, अस्तिव्यंग), गोविंद अंकुश वायकर (बीड, अस्तिव्यंग), शेख समिना बेगम शेख हमीद (बीड, अस्तिव्यंग), सुनिता भारत स्वामी (वडवणी, अल्पदृष्टी), निवृत्ती रामकिसन बेद्रे (शिरूर, अल्पदृष्टी), आणि बाळू उमाजी सुरासे (शिरूर, अल्पदृष्टी) यांचा समावेश आहे. दरम्यान सीईओ अजित पवार यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com