जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी लवकरच ऍक्शन प्लॅन

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न व सर्वांचे योगदान महत्वाचे - धनंजय मुंडे
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam Tv News

मुंबई : जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील पहिले राज्य असून, अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली, आहे या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हे देखील पाहा :

जादूटोणाविरोधी कायदा (Anti-Superstition and Black Magic Act) प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुणे (Pune) येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते.

Dhananjay Munde
राज्यावरील वीजसंकट अधिक गहिरं! काही प्रकल्पांमध्ये दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात, त्यात कायदा आपले काम करतोच परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत, यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा, या दृष्टीने एक ऍक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देशही धनंजय मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

समाजाला अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून, विभागाच्या (Social Justice Department) वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यावेळी म्हणाले.

Dhananjay Munde
तिथं १५८ जीव घेण्याची परवानगी मिळतेच कशी? सयाजी शिंदेंचा सायन रुग्णालयाला संतप्त सवाल

कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्री. श्याम मानव तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. औपचारिक उद्धाटन प्रसंगी सचिव श्री. सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांसह आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com