Shivaji University Exam Paper Leak Case : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील मोठी कारवाई; पेपरफुटी प्रकरणी शहाजी कॉलेजच्या कर्मचा-यांचे निलंबन

Third-year Suk Accounts Paper Leaked : संस्थेने नेमलेल्या समितीचा अहवाल जुलै महिन्याच्या अखेरीस आला.
Shivaji University Exam Paper Leak Case, Kolhapur, Shahaji College
Shivaji University Exam Paper Leak Case, Kolhapur, Shahaji Collegesaam tv

- रणजीत माजगावकर

Shivaji University News : काेल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रास धक्का देणारे प्रकरण नुकतेच समाेर आले हाेते. शिवाजी विद्यापीठाच्या पेपर फुटी (Shivaji University Exam Paper Leak) प्रकरणामुळे सर्वत्र नाराजीचा सूर हाेता. या प्रकरणी शहाजी काॅलेजच्या (shahaji college kolhapur) चार कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात एका संस्थेने एवढी मोठी कारवाई करण्याची पहिलीच घटना आहे.

Shivaji University Exam Paper Leak Case, Kolhapur, Shahaji College
Sangli DCC Bank: अध्यक्षांच्या दालनात संचालकांची झटापट? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकरण पाेचले पाेलिस ठाण्यात; जीवे मारण्याची तक्रार दाखल

शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अॅडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटी (Third-year Suk Accounts Paper Leaked) प्रकरणी शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेने बडतर्फीची कारवाई करीत बडगा उगारला आहे. सेवेतून बडतर्फ केलेल्यांमध्ये अधीक्षक रवींद्र भोसले, क्लार्क सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील आणि विशाल पाडळकर यांचा समावेश आहे (Maharashtra News)

Shivaji University Exam Paper Leak Case, Kolhapur, Shahaji College
Kolhapur Crime News : कापशी- लिंगणूर मार्गावर एलसीबीची माेठी कारवाई, बनावट सोन्याच्या बिस्किटांसह एकास घेतलं ताब्यात

विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षेतंर्गत ३१ मे २०२३ रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिवाजी विद्यापीठाने याची तात्काळ गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीमार्फत चौकशी सुरु केली.

गेले दोन महिन या प्रकरणाची चौकशी सुरू होती. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

Shivaji University Exam Paper Leak Case, Kolhapur, Shahaji College
Mahavitran च्या कारभारामुळे शेतक-यावर खाया पिया कुछ नहीं गिलास तोडा बारह आना म्हणण्याची आली वेळ; नेमकं काय घडलं क-हाडात

दरम्यान, शहाजी कॉलेज व्यवस्थापनाने साऱ्या प्रकाराची दखल घेतली. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी जूनमध्ये संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी त्रि-सदस्यीय समिती नेमली. चौकशी समितीकडून प्रकरणाची शहानिशा, तपास सुरु झाला.

दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीची चौकशी सुरु होती. दोन महिने याप्रकरणी चौकशी, संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब, कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया सुरु होती. संस्थेने नेमलेल्या समितीचा अहवाल जुलै महिन्याच्या अखेरीस आला.

त्यानंतर विद्यापीठ (university) परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन त्यांच्यावर सेवाशर्तीनुसार शिस्तभंगाची कारवाईची शिफारस ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात संस्था प्रशासनास केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com