औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन भोवणार?, अकबरुद्दीन ओवेसींवर कारवाई होणार- गृहमंत्री

''औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं कुणालाही आवडणारं नाही.''
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSaam Tv

नांदेड: एमआयएमचे (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज नांदेडमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं कुणालाही आवडणारं नाही. औरंगाबादचे पोलीस आयुक्त या प्रकरणाची चौकशी करीत आहेत नक्कीच या प्रकरणी कारवाई होईल असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी दोन दिवसांपुर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावंतर राज्यातील वातावरण तापले होते. शिवसेना राज्यात आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. औरंगाबादचे माजी खासदरा चंद्रकांत खैरे यांनी ओवेसींवरती जहरी टीका केली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerey) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातीस राजकारण तापले होते. यात आता ओवेसींच्या प्रतिक्रियेने भर पडली आहे. भूंकणाऱ्यांना भूंकूद्या असे म्हणत ओवेसींनी राज ठाकरेंवरती नाव न घेता टीका केली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकारणावरही टीका केली होती. अमरावतीचे आमदार आणि सध्या चर्चेत असलेल्या रवी राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरीत टीका केली होती.

दरम्यान आमदार रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीमधून या प्रकरणासंदर्भात त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackarey) निशाणा साधला होता. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगरात येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं राणा म्हणाले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com