कार्यकर्ता चतुर हवा, चतरा (अति हुशार) नको : नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य
नितीन गडकरी SaamTvNews

कार्यकर्ता चतुर हवा, चतरा (अति हुशार) नको : नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य

कार्यकर्ता चतुर असला पाहिजे, मात्र चतुर म्हणजेच अति शहाणा नको, असं सुचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नागपूर : कार्यकर्ता चतुर असला पाहिजे, मात्र चतुर म्हणजेच अति शहाणा नको, असं सुचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूरात समर्पण सेवा समितीच्या वतीनं दिवाळी मिलन सोहळा आणि विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांच्या 6 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या पुस्तक विमोचन कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

हे देखील पहा :

यावेळी गडकरी म्हणाले की, त्याकाळात भाजप ची नागपुरात ताकत नव्हती, एक आमदार सुद्धा नागपुरात नव्हता. मात्र, आम्ही खूप प्रयत्न केले आणि आज भाजप ला चांगले दिवस आले आहेत. भाजप मध्ये आपल्या कामाचा अहवाल देण्याची पद्धत आहे. गिरीश व्यास आणि मी जुन्या कार्यकर्त्यांपैकी आहोत. जुनं झालं की मोडीत निघतं, अस म्हणतात. मात्र, भाजप मध्ये असं होत नाही.

नितीन गडकरी
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये
नितीन गडकरी
हिंगोलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; सरपंच व ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप!

आणीबाणी च्या काळात गिरीश व्यास यांनी व मी काम केलं, नंतर युवा मोर्चाचं काम सुरू झालं. आम्ही सोबत काम करत होतो. संयमानं वागून काम करतो तो खरा कार्यकर्ता असतो आणि तीच खरी पक्षाची ताकत असते असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com