नेत्यांच्या आधी अभिनेते मदतीसाठी आले; राज्यपालांचा नेत्यांना टोला

संकटाच्या प्रसंगात मदतीसाठी खरे तर नेते आले पाहिजे होते, मात्र ते आले नाही, अभिनेते आले, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नेत्यांना टोला लगावला आहे.
नेत्यांच्या आधी अभिनेते मदतीसाठी आले; राज्यपालांचा नेत्यांना टोला
नेत्यांच्या आधी अभिनेते मदतीसाठी आले; राज्यपालांचा नेत्यांना टोलाविजय पाटील

सांगली: संकटाच्या प्रसंगात मदतीसाठी खरे तर नेते आले पाहिजे होते, मात्र ते आले नाही, अभिनेते आले...अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे कौतुक करत राजकीय नेत्यांना टोला लगावला आहे. तसेच प्रोटोकॉलवरून आयोजक व सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबाबत राज्यपालांनी प्रशासनालाही खडेबोल सुनावत माणुसकी जपण्याचा सल्ला दिला. सांगलीमध्ये आयोजीत पूरग्रस्त मुलींच्या सामुदायिक लग्न सोहळा व मदत कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. (Actors came to the aid before the leaders; The governor scolded the leaders)

हे देखील पहा-

सांगलीच्या कसबे डिग्रज नजीक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पूरग्रस्त भागातील मुलींचे सामूहिक विवाह सोहळे आणि कन्या सहाय्य ठेव योजना कार्यक्रम पार पडला. अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने आदी मान्यवर उपस्थित होते. दिपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सांगली जिल्ह्यातील 1 हजार मुलींचे सामुदायिक विवाह आणि 1हजार मुलींच्या नावे कन्या सहाय्य ठेव योजनेच्या माध्यमातून 50 हजार रुपये ठेव पावती वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोशारी बोलताना म्हणाले की, या ठिकाणी एक हजार मुलींना मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आणि पूरग्रस्त मुलींच्या लग्नासाठी 50 हजार रुपयांची ठेव ठेवली जात आहे ही खूपच कौतुकास्पद बाब आहे. खरंतर अशा या संकटाच्या परिस्थितीमध्ये नेते धावून आले पाहिजे होते, मात्र अभिनेते येऊन मदत करत आहेत अश्या शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी टोला लगावला आहे.

नेत्यांच्या आधी अभिनेते मदतीसाठी आले; राज्यपालांचा नेत्यांना टोला
अकोल्यातील विद्यार्थ्यांने बनवले कागदाच्या लगद्यापासून अष्टविनायक

तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजकांच्या कडून प्रोटोकॉलबाबत आलेल्या अडचणींवरून राज्यपालांनी प्रोटोकॉलची आपल्याला काही गरज नाही, पण तरीही नियमानुसार तो पाळला पाहिजे. पण या सर्व गोष्टी करत असताना याचा त्रास सर्वसामान्य आयोजकांना होता कामा नये याची दखल घेतली पाहिजे आणि मानवता दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघितलं पाहिजे असे खडे बोल यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शासनाला सुनावले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com