Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकून शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी; पाहा भावूक करणारा व्हिडिओ...

युवासेनाप्रमुखांचे भाषण ऐकून अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले.
Aditya Thackeray Shivsainik Emotional Video
Aditya Thackeray Shivsainik Emotional VideoSaam TV

औरंगाबाद : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रेदरम्यान मराठवाडा दौऱ्यावर आहे. शुक्रवारी त्यांनी औरंगाबादेत शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांचे भाषण ऐकून शिवसैनिकांना अश्रू अनावर झालेत. पक्षासोबत निष्ठा असावी तर अशी, अशा टॅंगलाईनखाली शिवसैनिकांचे भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Aditya Thackeray Latest News)

Aditya Thackeray Shivsainik Emotional Video
आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा; शिवसैनिकांनी संदीपान भुमरेंच्या बॅनरला फासले काळे

एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सुरूवातील आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अशातच प्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नव्याने पक्ष उभारणीस सुरूवात केली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाभवनात शिवसैनिकांच्या बैठका घेत आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात निष्ठा यात्रा काढली आहे. यानिमित्त ते महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवसैनिकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचे औरंगबादेत आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतही केलं. (Aditya Thackeray Aurangabad News)

आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत भावनिक संवादही साधला. या संवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युवासेनाप्रमुखांचे भाषण ऐकून अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. बाळासाहेब ठाकरेंचं या शहरावर विशेष प्रेम होतं. मात्र याच जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील शिवसेनेला तडे गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या गटातीव शिवसैनिक तसेच उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसैनिकांमध्ये सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे.औरंगाबादेत एवढी मोठी बंडखोरी झाल्यावर आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी जमेल का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह तरूण शिवसैनिकांनी मेळाव्यासाठी असंख्य सभा शेकडोंना येथे खेचून आणले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com