Aaditya Thackeray News: न्याय आपल्याच बाजूने होणार, ४० गद्दार हे राजकारणातून.., आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे
Aaditya Thackeray vs Eknath Shinde Group
Aaditya Thackeray vs Eknath Shinde GroupSaam TV

Aaditya Thackeray Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय आपल्या बाजूनेच होणार आणि ४० गद्दार हे राजकारणातून हद्दपार होणारच, असा शाब्दिक हल्ला त्यांनी शिंदे गटावर केला. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकला आहे, अशी सडकून टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

Aaditya Thackeray vs Eknath Shinde Group
Narendra Modi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, पाहा VIDEO

मराठवाड्याच्या पैठण (Paithan) विधानसभा मतदारसंघातील बिडकीनमध्ये शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यात शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज झंझावाती सभा घेतली. गद्दार गँगच्या पालकमंत्री यांनी धुमाकूळ घातला असताना येथील स्थानिक जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवत सरपंच आणि पंचायत समितीला विजय मिळवून दिला. यावरून येथील जनतेने गद्दारांना नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले, त्याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पैठणच्या जनतेचे आभार मानले. (Maharashtra Political News)

Aaditya Thackeray vs Eknath Shinde Group
Sanjay Raut News: नाना पटोलेंनी पद सोडलं नसतं तर सरकार पडलं नसतं; संजय राऊत स्पष्टच बोलले

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे तर दुसरीकडे राज्यात एकमेव शेतकरी ज्यांच्या शेतात २ हेलिपॅड उतरतात ते म्हणजे मंत्रालायत बसणारे मुख्यमंत्री, असा चिमटा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना काढला. ज्या सुरत या गद्दारांना लपून बसले होते त्या सुरत व गुजरात सरकारच आभार मानायला यांनी येथील उद्योगधंदे पळवले, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) लगावला.

'खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी'

युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पैठण शहरात लावलेले स्पीड ब्रेकर आपलं सरकार आल्यावर सपाट करून टाकू आणि महाराष्ट्राची विकासकामे गतिमान करू. निवडणुका लागतील तेव्हा संपूर्ण वातावरण भगवेमय होणार असल्याचा विश्वास पैठणमधील बिडकीन नगरीत आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Aaditya Thackeray vs Eknath Shinde Group
Pune News : 'ओ शेठ' अन् 'साहेब' जोरदार भिडले; फुकट सूपच्या ऑफरवरून पुण्यात तुफान राडा

'ही आव्हान न स्वीकारणारी खोके गँग'

युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगनी दिली नाही. ही आव्हान न स्वीकारणारी खोके गँग आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मविआ सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्र पुढे नेत राज्याला सुवर्णकाळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना राक्षसी महत्त्वाकांक्षी असणाऱ्यांनी सरकार पाडलं, असं देखील आदित्य ठाकरे म्हणआले. संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय आपल्या बाजूनेच होणार आणि ४० गद्दार हे राजकारणातून हद्दपार होणारच, असं चँलेंज देखील आदित्य ठाकरेंनी दिलं.

'गद्दारांचे डिपॉझिट जप्त करणार'

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी भाषणात गद्दार असा उल्लेख केल्यानंतर ५० खोके एकदम ok अशा घोषणांचा आवाज सभेतील जनतेतून दुमदुमला. गद्दारांचे डिपॉझिट जप्त करणार अशा घोषणाही यावेळी जनतेने दिल्या. सत्तामेव जयतेला महत्त्व नाही तर सत्यमेव जयतेला शिवसेना महत्त्व देते. कृषी आणि उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना चिकटून राहिले त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com