मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला पूल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभारणार

आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने उभारलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.
Aditya Thackeray, CM Eknath Shinde
Aditya Thackeray, CM Eknath ShindeSaam TV

नाशिक : काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुढाकारने नाशिकमधील शेंद्रीपाडा गावात लोखंडी पूल उभारण्यात आला होता. मागील आठवड्यात हा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा पूल पुन्हा तातडीने उभारण्याचे आदेश दिले आहेत. (Eknath Shinde Latest News)

Aditya Thackeray, CM Eknath Shinde
'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती'

गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारण्यात आलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या पूलाची खूप मदत होती. मात्र, आता हा पूलच वाहून गेल्याने शेंद्रीपाड्यातील नागरिकांची अवस्था बिकट झाली. याबाबतचं वृत्त साम टिव्हीने प्रकाशित केलं होतं.

दरम्यान, आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून साम टिव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. वाहून गेलेल्या पुलाच्या जागी तातडीनं दुसरा लोखंडी पूल उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्यात. पुढच्या २-३ दिवसांत या ठिकाणी तब्बल १५०० किलो वजनाचा नवा लोखंडी पूल बसवण्यात येणार आहे. (Aditya Thackeray Latest News)

Aditya Thackeray, CM Eknath Shinde
बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच; संजय राऊतांचा हल्लाबोल

मे महिन्यात नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाडा येथील महिलांचा लाकडी बल्ल्यावरून पाण्याचे हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओची तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली होती. आदित्य ठाकरे यांनी स्वतः शेंद्रीपाड्याला भेट दिली होती. यानंतर याठिकाणी एक लोखंडी पूल उभारण्यात आला होता. या लोखंडी पुलाच्या उदघाटनासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला हा लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे शेंद्रीपाड्यातील आदिवासी महिलांना पुन्हा एकदा हंडाभर पाण्यासाठी लाकडी बल्लीवरून नदी ओलांडण्याची वेळ आली. याबाबतचं वृत्त साम टिव्हीने प्रकाशित केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताची दखल घेत हा पूल पुन्हा नव्याने उभारण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com