Saam Impact: शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेवर प्रशासक नियुक्त
Saam Impact: शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेवर प्रशासक नियुक्तविनोद जिरे

Saam Impact: शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेवर प्रशासक नियुक्त

शिक्षकांनी मानले साम टीव्हीचे आभार

विनोद जिरे

बीड: बोगस आधार कार्डच्या माध्यमातून काल्पनिक विद्यार्थी दाखवून विमुक्त जाती आणि भटक्या जमतीच्या निवासी आश्रम शाळेत लाखो रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार साम टिव्हीने समोर आणला होता. या प्रकरणात वि. ज. भ. ज. मंत्रालयाच्या उप सचिवांनी आश्रम शाळेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. यामुळे बीड Beed जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

सामाजिक न्याय मंत्र्याच्या बीड जिल्हयात वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा, प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील बोगस विदयार्थी रॅकेट शिक्षकांच्या माध्यमातून साम टिव्हीने समोर आणले होते. तशी तक्रार देखील शिक्षकांनी केली होती .गेल्या पाच वर्षा पासून हा प्रकार सुरू असल्याने शिक्षण विभाग आणि वि ज भ ज मंत्रालयाला फसवून कोट्यवधीचा शासनाला गंडा घातला होता. यात 237 विदयार्थी काल्पनिक होते.बीड जिल्ह्यात इतर 45 आश्रम शाळा आहेत .या सर्वांची चौकशी केली जावी. अशी मागणी केली जातेय.विमुक्त जाती,आणि भटक्या जमतीच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी. या उद्देशाने शासनाने सुरू केल्या निवासी आश्रम शाळा चे वास्तव साम टिव्हीने समोर आणलं होत.

Saam Impact: शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेवर प्रशासक नियुक्त
Delhi: भाजप खासदार मनोज तिवारी निदर्शना दरम्यान जखमी; रुग्णालयात दाखल

पाटोदा तालुक्यातील डोंगर पट्ट्यात वडझरी गावात बहुतांश डोंगर पट्ट्यातील ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी जात असतात. यातच इतर भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षण मिळावे व निवासाची सोय व्हावी. या हेतूने राज्य सरकारने सुरू केलेल्या विजभज निवासी आश्रम शाळेमध्ये काल्पनिक विदयार्थी दाखवून शासनाच्या योजनेचा लाभ घेतला गेल्याचं समोर आलं आहे.यात शालेय पोषण आहार काळाबाजार,पुस्तक व शैक्षणिक साहित्य रद्दीमध्ये विकली जात असल्याचं शिक्षक सांगत आहेत. शाळेवर कारवाई झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.संस्था चालक आणि मुख्याध्यापकाच्या जाचास कंटाळलो होतो. आता प्रशासक नियुक्त केल्यामुळे कारभार बदलेल. मात्र अशा संस्था चालकाला धडा शिकवला पाहिजे असं देखील शिक्षक म्हणाले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.