ऑनलाईन लेक्चरमध्ये पाठवले अश्लील व्हिडीओ अन् मेसेज; नांदेडमधील 2 विद्यार्थी अटकेत

ग्रामीण पालीटेक्निक काॅलेजचे विद्यार्थी
Gramin Technical Management Collage, Nanded Crime News, Nanded Latest Marathi News
Gramin Technical Management Collage, Nanded Crime News, Nanded Latest Marathi Newsसंतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झालेली सध्या दिसून येत आहे. तंत्रज्ञाचा गैरवापर करून नांदेडच्या दोन विद्यार्थांनी आॅनलाईन शिक्षणासाठी तयार केलेल्या लिंकची बनावट आयडी करुन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अश्लील मॅसेज, व्हिडीओ पाठवण्याचे उद्योग केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (Nanded Crime News)

Gramin Technical Management Collage, Nanded Crime News, Nanded Latest Marathi News
राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; राज्य सरकारचा निर्णय

What's App ग्रुप मधून रिमुव्ह केल्याचा राग मनात धरुन दोन विद्यार्थ्यांनी बनावट आयडीद्वारे विद्यार्थी, प्राध्यापकांना अश्लील मॅसेज, व्हिडीओ पाठवल्याने खळबळ उडाली. विष्णुपुरी येथील ग्रामीण पालीटेक्निक काॅलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी काल दोन विद्यार्थ्यांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांना अटक ही केली आहे.

हे देखील पाहा-

कोरोना काळात ग्रामीण पाॅलीटेक्निक काॅलेजने विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी एक लिंक तयार केली होती. दरम्यानच्या काळात विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांना अश्लील मॅसेज, व्हिडीओ येऊ लागले. काॅलेज व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याचा शोध घेतला असता आश्लिल मॅसेज आणि व्हिडीओ टाकणारे काॅलेजचेच विद्यार्थी निघाले. टारगटपणामुळे काॅलेजने त्यांना ग्रुपवर मधून काढून टाकले होते याचाच राग मनात धरुन विद्यार्थांना हा उपद्व्याप केलाय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com