भेसळयुक्त रेमडेसिवीर वापरले; डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाचा (Coronavirus) कहर जगभर सुरू असताना दुसऱ्या लाटेत मोठा गंभीर परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर झाला.
भेसळयुक्त रेमडेसिवीर वापरले; डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
भेसळयुक्त रेमडेसिवीर वापरले; डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखलSaam Tv

लातूर: जिल्ह्यातील (Latur District) उदगीर इथं एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा (Coronavirus) कहर जगभर सुरू असताना दुसऱ्या लाटेत मोठा गंभीर परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर झाला. एप्रिल आणि मे महिन्यात उपचार करताना बनावट व भेसळयुक्त रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्यात आल्या प्रकरणी एका डॉक्टरवर लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित राज्यातील पहिलीच घटना घडली आहे.

उदगीर शहरातील बिदर रोडवरील हिंदुस्थान कॉलनीत राहणारे महेश त्र्यंबक जीवने याच्या आईला कोरोनाची लागण 17 मे 2021 रोजी झाली होती. यावर उपचार करण्यासाठी शेलाळ रोडवरील उदयागिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान 17 एप्रिल ते 2 मे या काळात आईवर उपचार सुरू होते. या काळात बनावट व भेसळयुक्त रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता.

यावर डॉ. माधव नामदेव चांबुले यांनी संगनमत करत 90 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अशी फिर्याद महेश जीवने यांनी दाखक केली आहे. यावरून, उदगीर येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट व भेसळयुक्त रेमाडिसिव्हिर वापरून उपचार केल्याची कदाचित राज्यातील पहिलीच घटना घडली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com