गो हत्या बंदीनंतर देखील राज्यातील गोवंश घटलाच!

आपल्या राज्यात २०१२ मध्ये पशुगणना करण्यात आली होती. त्यावेळी गोवंश हत्या बंदी कायदा नव्हता.
गो हत्या बंदीनंतर देखील राज्यातील गोवंश घटलाच!
Cattle slaughter ban lawSaam TV

औरंगाबाद: गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर (Cattle slaughter ban law) आपल्या राज्यात गोवंश वाढला असेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही, गोवंश वाढण्याऐवजी तो घटला आहे. गोवंश कमी होऊ नये म्हणून महाराष्ट्रात (Maharashtra) ४ मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा आणण्यात आला. यात गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या वाढेल असं वाटत होतं. पण या गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर गोवंश वाढण्याऐवजी कमी झाल्याचं आपल्या राज्यात समोर आलंय.

आपल्या राज्यात २०१२ मध्ये पशुगणना करण्यात आली होती. त्यावेळी गोवंश हत्या बंदी कायदा नव्हता. त्यावेळच्या पशुगणनेनुसार राज्यात १ कोटी ५४ लाख ८४, २०७ गायी, बैल, वळू होते. त्यांनंतर कायदा झाला.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा झाल्यानंतर ही पहिली पशुगणना होती. २०१९-२० या वर्षाच्या पशुगणनेत ही संख्या १ कोटी ३९ लाख ९२,३०४ वर आली आहे. म्हणजेच या काळात १४ लाख ९१,९०३ गाय-बैल कमी झाले आहेत.

Cattle slaughter ban law
श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये आर्थिक आणीबाणी; सामान खरेदीसाठी थेट भारतीय बाजारपेठेत

ग्रामीण भागात पशुपालक आणि शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून असलेल्या गाईंची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे वळू आणि बैल कमी झाले आहेत.

विशेष म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेतकरी गोवंश वाढीसाठी फारसा प्रयत्नशील दिसत नसल्याने कायदा करूनही गोवंश वाढण्याऐवजी तो घटत चालला आहे.

गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन असायचे. त्यात सर्वाधिक पसंती होती ती गाईला. गायीचा सांभाळ केल्यानं दुधा सोबतच वळू आणि बैल शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळायचे. आता गाय सांभाळायची म्हणली तर लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत आहे. शिवाय शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे वळू आणि बैलांची गरज भासत नसल्यामुळे शेतकरी गोवंश वाढवण्यासाठी फारसा इच्छुक नाही.

४ मार्च २०१५ पासून गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हा कायदा पशुधन वाढण्यासाठी कुचकामी असल्याचं राज्याने केलेल्या पशुगणनेवरून दिसतंय.

विशेष म्हणजे, ज्या पशूंची हत्या करण्यास परवानगी आहे, त्यांची संख्या वाढलीय. २०१२ मध्ये ५५ लाख ९४, ३९२ म्हशी होत्या. २०१९-२० मध्ये त्यात ९,३०० ने वाढ झाली. म्हणजे शेवटच्या पशुगणनेत म्हशींची संख्या ५६ लाख ३,६९२ झाली आहे. मेंढ्यांमध्येही ९९, ९४८ ची वाढ झाली आहे. बकऱ्यांची संख्या २१ लाख ६९,५७६ ने वाढ झाली आहे. २०१२ च्या नोंदीनुसार वराहांची संख्या ६५, १५१९५,८४९ होती.

ती २०१९-२० दरम्यान वाढून १ लाख ६१ हजारवर गेली. त्यामुळे ही आकडेवारी पाहता गोवंश वाढला नाही हे स्पष्ट झालंय. एकीकडे आपल्या राज्यात वेगळा देशी गाईंचा वंश वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात गोवंश वाढत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे कायदा करून काही साध्य होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हेच राज्यात झालेल्या पशुगणनेवरून लक्षात घ्यावं लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.