लसीकरणाने बदलली दृष्टी 70 वर्षाच्या आजीने पाहिली सृष्टी...

वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षाच्या वर्षाच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते.
लसीकरणाने बदलली दृष्टी 70 वर्षाच्या आजीने पाहिली सृष्टी...
७० वर्षीय मथुराबाई बिडवेगजानन भोयर

वाशिम: कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल (Corona vaccine) समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे सरकारकडून दिली जाणाऱ्या लसीकरण केंद्राकडे अनेकांनी पाठ फिरवली जात असल्याचे आपण बघतो. मात्र काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना सकारात्मक आणि चमत्कारिक परिणाम ही दिसायला लागले आहेत. वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी भागातील एका आजींची गेल्या 9 वर्षापासून गेलेली दृष्टी चक्क लस घेतल्यानंतर वापस आली आहे. लसीकरणाने आजीची दृष्टी बदलल्याने आता आजीला सृष्टी पाहायला मिळणार आहे.

वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षाच्या वर्षाच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते. कारण दहा वर्षापूर्वी मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद झाले. मथुराबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या रहिवाशी होत्या. त्यांना 9 वर्षा अगोदर अंधत्व आलं आणि त्यांच्या जीवन कायमच अंधारमय झालं. घरी मुलबाळ पती नसलेल्या त्यांच्या नातेवाईकाने आधार देण्यासाठी रिसोड येथे आणले. या दरम्यान या आजीने 26 जूनला रिसोड येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड (Covishield) या लसीचा पहिला डोस घेतला आणि या आजीला आता आजीला एका डोळ्यांनी दिसायला लागलं.

७० वर्षीय मथुराबाई  बिडवे
#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या

मथुराबाई ह्या मुळात जालना जिल्ह्यातील (Jalna district) त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांना आम्ही रिसोड येथे आधार देण्यासाठी आणले, मात्र गेल्या काही दिवसात कोरोना आल्यामुळे सर्वजण लसीकरण करीत आहेत. आजी अंध असल्यामुळे ती लस घेण्यास नकार देत होती मात्र आम्ही तिला लस दिली आणि काय ते नवलच घडलं चक्क आजीला दृष्टी आली त्यामुळं आम्हाला पण आमच्या आजीचं कौतुक करावसं वाटत असून,सर्वांनी कोरोना लस घ्यावी अशी विनंती करीत असल्याचं त्यांचा शंकर सांगतोय.

आजीला गेली 9 वर्षा पासून दिसत नव्हते आता त्यांना लस घेतल्यामुळे अचानक स्पष्ट दिसायला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी, मात्र डॉक्टरांनी लस घेतल्यामुळे असे होऊ शकत अस सांगता येत नसेल तरी. मेडिकल शास्त्र जरी या गोष्टीला नाकारत असले तरी आजीला मात्र सुष्टी येऊन दिसायला लागल त्यामुळं मथुराबाई यांनी सर्वांनी लस घ्यावी असं आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com