विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड

भमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे असे मत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड
विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाडप्रदीप भणगे

डोंबिवली : पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा आज डोंबिवली मध्ये निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव का दिले पाहिजे याची माहिती त्यांनी दिली.

तसेच भाजप खा.कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री झाले म्हणून त्याचे अभिनंदन करत त्यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी जे भव्य आंदोलन भूमिपुत्रांनी केले त्यातील ताकत पाहूनच भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे.

हे देखील पहा -

वार्तालापावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी उत्तरे दिली. टोरोंटो बाबतीत त्यांनी सांगितले की पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे टोरोंटो प्रकल्प भूमिपुत्रांवर लादण्यात आला आहे. भूमीपुत्रांनी ठरवले पाहिजे यापुढे आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नाही. हे ठरवले पाहिजे तरच टोरोंटो कंपनीचा प्रकल्प येथून जाईल.

विमानतळ आंदोलन पाहूनच खा.कपिल पाटलांना मंत्रिपद - गायकवाड
मृतांचे आकडे राज्य सरकारने लपवले नाहीत; टोपेंचा दावा

आमदार राजू पाटील हे आमच्या समाजाचे आमदार आहेत आणि ते पुन्हा निवडून यावे याकरीता मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा प्रचार करणार आहे. येणाऱ्या केडीएमसी निवडणुकीत आम्ही किमान आरपीआयचे पाच नगरसेवक तरी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजी आमदार सुभाष भोईर यांना जर कल्याण ग्रामीण मध्ये तिकीट दिले असते तर ते पन्नास हजार मतांनी निवडून आले असते. मात्र आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. आत्ताची शिवसेना अन्यायकारक आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.