तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला पेणच्या कर्मचाऱ्यांची साथ
तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!
तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!राजेश भोस्तेकर

-- राजेश भोस्तेकर

रायगड : एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे अशी कळकळीचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले असून त्याच्या या आवाहनाला जिल्ह्यातील पेण आगारातील दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. रायगड जिल्ह्यातील रस्त्यावर तेरा दिवसाने लालपरी धावू लागली.

पेण खोपोली, पेण नागोठणे रस्त्यावर आज प्रवाशांना घेऊन एसटी बस पेण आगारातून बाहेर पडली. यावेळी पोलिसांचे संरक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी साम टीव्हीला दिली.

हे देखील पहा :

एसटी महामंडळ शासनात विलनिकरण करण्याच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. रायगड जिल्ह्यातही हीच भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्याचा पगारात 41 टक्के वाढ परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर करून कामावर हजर राहण्याचे आवाहन केले.

तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!
बेकायदा कोकेन बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास अटक
तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
तेरा दिवसानंतर पेण-खोपोली-नागोठणे रस्त्यावर धावली लालपरी!
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील आठ पैकी पेण आगारातील दहा ते बारा चालक, वाहक कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आज तेरा दिवसाने पेण आगारातून खोपोली कडे तीन तर नोगोठणेकडे एक फेऱ्या एसटी बसेसच्या सोडण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. मात्र, एसटी सेवा खोपोली, नागोठणे रस्त्यावर सुरू झाल्याने प्रवासी सुखावले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com