
Pratapgad News : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान (Afzal Khan) याचा वध केला हाेता. त्यानंतर तेथेच त्याची कबर बांधण्यात (Afzal Khan Tomb) आली. या कबरी भाेवती माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले हाेते. ते पाडलं जावे यासाठी शिवप्रेमी आग्रही हाेती. त्यासाठी संघर्ष देखील झाला. आज प्रशासनाने कबरी भाेवतीचे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला आहे. या कारवाईची शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले श्री शिवप्रताप भूमी मुक्ति आंदोलनाच्या लढ्यास आज यश आलं आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात झाली आहे याचा आनंद वाटताे. आमच्यासह अनेकांनी श्री शिवप्रताप भूमी मुक्ति आंदोलनाच्या माध्यमातून गेली बावीस वर्षे अतिक्रमण पाडलं जावे यासाठी आंदोलन उभं केले होते. त्याला अखेर यश आलं आहे. जय भवानी जय शिवाजी. (Maharashtra News)
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चाैगुले म्हणाले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळचे अनधिकृत बांधकाम (encroachment) हटविण्यास सुरुवात झाली आहे ही गाेष्ट प्रत्येक शिवप्रेमींसाठी (chhatrapati shivaji maharaj) अभिमानास्पद आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान 'शिंदे फडणवीस' सरकरचे अभिनंदन करीत आहे.
हिंदूत्ववादी सरकारने पहाटेच सर्जिकल स्ट्राईक करुन जावळीच्या खोऱ्यात जन्मलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण पाडून पराक्रम घडवला असेही नितीन चौगुले यांनी स्पष्ट केले. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.