डागाळलेल्यां लोकांना मंत्रिमंडळात का घेतलं? शिंदे सरकारच्या विस्तारावर संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

'राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत हे मला पण माहित आहे. मात्र, राजकारणासाठी पैसा लागतो.'
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji RajeSaam TV

औरंगाबाद : मंत्रिमंडळात कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे. मात्र, चांगले लोक असतांना डागाळलेल्यां लोकांना मंत्रिमंडळात का घेतलं हा प्रश्न उपस्थित होतो असं म्हणत छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळावर भाष्य केलं.

काल शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला यामध्ये माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) व टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रीपद दिल्याने शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमिवर संभाजीराजे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मंत्रिमंडळमध्ये कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे. मात्र, चांगले लोक असतांना डागाळलेल्यां लोकांना मंत्रिमंडळात का घेतलं हा प्रश्न उपस्थित होतो. तसंच शरद पवार काय बोलले माहीत नाही. पक्ष चिन्ह पळवापळवी यावर मी बोलणार नाही. मला माझे संघटन आणि चिन्ह सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.

पाहा व्हिडीओ -

राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत हे मला पण माहित आहे. मात्र, राजकारणासाठी पैसा लागतो, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून लगेच संघटन राजकीय करणे शक्य नाही. मी कुणालाही गुहावाटीला किंवा काश्मीरला घेऊ जाऊ शकत नाही. पैसे असतील तरच राजकारण शक्य आहे असं म्हणत संभाजीराजे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिवर टोलेबाजी देखील केली.

दरम्यान, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझे आमरण उपोषण सोडवले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आता दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचही संभाजीराजे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासने आता पुर्ण करण्याची वेळ आली आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
Jalgaon: शिंदे गटात पहिल्या फळीत सहभागी तरी मंत्रिपदासाठी उपेक्षाच

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मराठा आरक्षणाचा विषय माहीत आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच आरक्षण दिलं होतं तर शिंदे हे नेहमी मराठा समाजाच्या बाजूने असतात. त्यामुळे त्यांना देखील माहित आहे की टीकणारं आरक्षण दिलं पाहिजे. तसंच सगळ्या मागण्या पुर्ण करतो असं शिंदे बोलले होते.

गरीब समाजातील मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी आमची मागणी असल्याचही संभाजीराजे म्हणाले. तर स्वराज्य संघटना ही तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी असून शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले आम्ही पण गरिबांना बळ देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com