पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देतांना जी 'मस्टर' ची अट लावली त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभं करत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!
पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!अरुण जोशी

अमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देतांना जी 'मस्टर' ची अट लावली त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभं करत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबतच बऱ्याच लाभार्थ्यांना धनादेशाचा दुसरा टप्प्पा सुद्धा अजून पर्यंत मिळालेला नाही. यातील बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

हे देखील पहा :

अशातच या घरकुल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी ह्या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे व शहर जिल्हा अध्यक्ष निलेश शर्मा यांच्या नेतृत्वात आज गाढव आंदोलन करण्यात आले. या वेळी जवादे मंगल कार्यालय बस स्टैंड अमरावती येथून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मालटेकडी कार्यालय येथे गाढव घेऊन कार्यकर्ते पोहचले.

पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!
Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा!

तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी हि करण्यात आली या आंदोलनात साहिल सोलीव, अनिरुद्ध होले, कृणाल विधले ,प्रफुल संप, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, हेमंत बोबडे, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com