स्पीड ब्रेकरसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको...

सांगली जिल्ह्यातील अडवळणी गावाजवळच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.
स्पीड ब्रेकरसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको...
स्पीड ब्रेकरसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको... विजय पाटील

सांगली: अडवळणी गावाजवळील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे. तासगाव रोडवर प्रचंड वाहतूक आणि वर्दीळीमुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून अपघात होत आहेत. तसेच अनेक नागरिक आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर स्पीड ब्रेकर्स बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

हे देखील पहा -

बुधगांव मध्ये अडवळणी गांव असल्याने रस्त्यावर कुठल्या ही प्रकारचे स्पीड ब्रेकर नाहीत. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगूनही स्पीड ब्रेकर केले जात नाहीत त्यामुळे आज संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केला. तब्बल 1 तास हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्पीड ब्रेकर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको ग्रामस्थांनी थांबवला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com