परभणीत रस्त्यासाठी प्रहारचे चिखलात लोटांगण आंदोलन

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असून रस्त्यावरून चालण्यासाठी देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
परभणीत रस्त्यासाठी प्रहारचे चिखलात लोटांगण आंदोलन
परभणीत रस्त्यासाठी प्रहारचे चिखलात लोटांगण आंदोलनराजेश काटकर

राजेश काटकर

परभणी - एकीकडे आज मराठवाडा Marathwada मुक्ती संग्राम दिवस साजरा करत आहे, तर दुसरीकडे परभणी Parbhani शहरात रस्ते नसल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते परभणी मनपाच्या विरोधात चिखलात लोटांगण आंदोलन करत आहे. परभणी शहर महानगर पालिका हद्दीतील जुना पेडगाव Pedgaon रोड ते उघडा महादेव मंदिर रोड वरील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून झाले नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असून रस्त्यावरून चालण्यासाठी देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.

हे देखील पहा -

तर अनेक वर्षांपासून नाल्याचे काम न झाल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर मोठ मोठाले खडे असल्याने अपघात होतात महानगर पालिकेकडे रस्त्याचा निधी पडून असून तो खर्च करण्यात येत नाही. वेळोवेळी निवेदने देऊन महानगर पालिका दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार कडून महापालिकेचा निषेध करत लोटांगण आंदोलन करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com