अकोल्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

विविध मागण्यांना घेऊन MPSC च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्यांसंदर्भात अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.
अकोल्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन
अकोल्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलनजयेश गावंडे

अकोला : स्पर्धा परीक्षा भरती संघर्ष कृती समितीने आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे. यामध्ये एमपीएससी MPSC परीक्षांच्या संदर्भात राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. Agitation of MPSC students in Akola

हे देखील पहा -

सोबतच या विद्यार्थ्यांकडून विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. एमपीएससीचे वेळापत्रक लवकरात लवकर काढा, यूपीएससीच्या UPSC धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा नियमित घ्याव्या, 2020 ची एमपीएससी ग्रुप बी ची तारीख दहा दिवसांत जाहीर करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहा सदस्यांची नियुक्ती दहा दिवसांत करा, एमपीएससी आणि महाआईटीची परीक्षा लवकरात लवकर घेऊन अंतिम निकाल लवकर लावावा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि पोलिस उपनिरीक्षक यांची शारीरिक चाचणी लवकर घेऊन अंतिम निकाल तातडीने लावावा, रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या तातडीने द्या, वर्ग 3 व 4 च्या परीक्षा खासगी कंपनीकडून न घेता एमपीएससीकडूनच घ्यावीत, कंत्राटी पद्धत रद्द करावी, गेल्या तीन वर्षांत पोलिस भरती झाली नाही.

अकोल्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन
चिंताजनक ! भंडारा जिल्ह्यात कोरोना नव्हे तर वाढतोय 'हा'आजार

येत्या दहा दिवसांत महापरीक्षा पोर्टलवर भरून घेतलेल्या पाच हजारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या 12 हजार 534 पदांची भरती तातडीने करा, येत्या दहा दिवसांत सरळसेवा भरती आणि मेगा भरतीची तारीख दहा दिवसांत जाहीर करा, अशा 19 मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा भरती संघर्ष कृती समितीचे दीपक पठाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सागर गव्हाळे, दीपक पवार, विशाल सारडा, रोशन गवई यांच्यासह आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com