कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतला शेतकऱ्याच्या घरी जेवणाचा आस्वाद !

सोंडले या गावामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये जाऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी या गरीब शेतकऱ्यासोबत जेवण केले.
कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतला शेतकऱ्याच्या घरी जेवणाचा आस्वाद !
कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतला शेतकऱ्याच्या घरी जेवणाचा आस्वाद !भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : कृषी मंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्याचा पिक पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक न घेता सर्व अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावरच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. Agriculture Minister Dada Bhuse enjoyed a meal at a farmer's house!

हे देखील पहा -

या बैठकी दरम्यान कमी पाण्यामध्ये उत्तम पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी पाण्यामध्ये नियोजन करून कशा पद्धतीने शेती केली आहे या संदर्भातील माहिती इतर शेतकऱ्यांना देखील देण्यात आली आहे.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतला शेतकऱ्याच्या घरी जेवणाचा आस्वाद !
उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूस

सोंडले या गावामध्ये कृषी अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर नंदुरबार च्या दिशेने मार्गस्थ होत असताना रस्त्यात एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये जाऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी या गरीब शेतकऱ्यासोबत जेवण केले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com