कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौरा

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या परिसरातील शेतीची पाहणी केली आहे
कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौरा
कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौराभूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या परिसरातील शेतीची पाहणी केली आहे. जून महिना संपल्यानंतर देखील अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिजे तितक्या प्रमाणात पडला नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. Agriculture Minister Dada Bhuse's crop inspection tour

हे देखील पहा -

गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगातर्फे जिल्हा परिषद त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकी संदर्भातील धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आल्याने कृषिमंत्र्यांना पाहणी दौरा करता आला नव्हता. मात्र कालच राज्य निवडणूक आयोगातर्फे जुलै महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणूका डेल्टाप्लस व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यानंतर आज धुळे जिल्ह्यात पिक पाहणी दौरा केला असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले .

कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौरा
कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतला शेतकऱ्याच्या घरी जेवणाचा आस्वाद !

कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतात जाऊन पिक पाहणी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. तसेच यानंतर पाऊस पडल्यानंतरही शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये मोठी घट देखील येणार असल्याचे म्हणत त्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे आवश्यक ती मदत शेतकऱ्यांना केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com