कृषी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा
कृषी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा स्वाभिमानी संघटनेचा इशारासंजय जाधव

कृषी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा

मागील वर्षीच्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पिकांना लागलेला खर्च देखील निघाला नाही

बुलढाणा : मागील वर्षीच्या सततच्या पावसामुळे Rain आणि अतिवृष्टीमुळे Heavy rain शेतकऱ्यांना farmers खरीप हंगामामध्ये पिकांना लागलेला खर्च देखील निघाला नाही. आनेवारी ५० पैशाच्या आतच असतांना सुद्धा पिक विमा कंपनीने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पिक विम्यापासुन वंचित ठेवले आहे. पिक विमा Insurance रक्कम रोखणाऱ्या कंपन्यांच्या मालकावर गुन्हे दाखल केले पाहिजे.

शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळवून, देण्याकरिता शेतकऱ्यांना सोबत घेऊन २६ जुलै या दिवसापासून कृषी आयुक्त पुणे Pune कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. विमा भरपाईची मागणी करून शेतकरी थकले आहेत. अनेकदा निवेदन देऊन, मोर्चे काढले पण शासन- प्रशासनावर कोणताच फायदा झालेला नाही, तसेच प्रशासन यावर एक शब्द देखील बोलण्यास तयार नाही.

हे देखील पहा-

लोकप्रतिनिधीं कंपनी कडून चांगभल करून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे महापाप केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा मिळवून, देण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghatana तालुका स्तरावर आणि जिल्हा व विधानभवन हे शासन स्तरावर राज्यामधील अतिउच्च सभागृह असल्याने त्याठिकाणी न्याय मागितला पाहिजे.

कृषी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा
VIDEO | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मुंबईत मंत्रालयासमोर दूध फेको आंदोलन

पंरतु, न्याय मिळाला नसल्याने, प्रशासन स्तरावर कृषी आयुक्त पुणे या सर्वोच्च आहेत. आता शेवटचा पर्याय म्हणून, मा. कृषी आयुक्तांकडून न्याय हक्क मिळवून घेण्याकरिता २६ जुलै दिवशी पुणे या ठिकाणी सुरू होणाऱ्या लढाईत मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डीक्कर यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com