'गोल्डनमॅन' गेला शनि शिंगणापुराच्या दर्शनाला अन् चाहत्यांनी केली एकच गर्दी

गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले हे कोणत्याही ठिकाणी गेल्यावर त्यांच्या पाहण्यासाठी युवकांची एकच गर्दी होते. असाच प्रकार अहमदनगरच्या शनि शिंगणापूर मंदिरात पाहायला मिळाला आहे.
ahmednagar news
ahmednagar news saam tv

अहमदनगर : देशात सोन्याचे दागिने घालणे पसंत नाहीत, असे क्वचितच व्यक्ती असतील. भले आता सोने महाग झाले तरी अनेकांना काही प्रमाणात दागिने घालण्याची हौस असते. फॅशन आणि आधुनिक दिसण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणी आपली काही कमाई सोने खरेदीवर खर्च करतात. अशाच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील किलोभर सोने घालणाऱ्या तरुणांनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील सनी वाकचौरे,बंटी गुजर यांच्या किलोभर सोने घालण्याच्या फॅशनचे इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो चाहते आहेत. गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले हे कोणत्याही ठिकाणी गेल्यावर त्यांना पाहण्यासाठी युवकांची एकच गर्दी होते. असाच प्रकार अहमदनगरच्या शनि शिंगणापूर मंदिरात पाहायला मिळाला आहे.

ahmednagar news
१५००० दुर्मिळ झाडांनी आंबिवली टेकडी झाली हिरवीगार; राष्ट्रीय स्तरावर दखल

पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवडमधील गोल्डनमॅन सनी वाकचौरे, बंटी गुजर व विपुल वाखुरे आज अहमदनगरमधील शनि शिंगणापूर दर्शनाला आले होते. हे गोल्डनमॅन शनि दर्शनाला आल्याने त्यांची माहिती युवकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. हे मंदिरात आल्यानंतर अवघ्या काही वेळाने यांना पाहण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे मंदिरात आलेल्या सर्वांना घाईगडबडीच दर्शन घेऊन आटोपून काढता पाय घ्यावा लागला. तर दुसरीकडे दर्शनानंतर या गोल्डनमॅनला मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी सुरक्षा विभाग व पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाली. यावेळी वाकचौरे व गुजर यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले. या गोल्डनमॅनचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे देखील पाहा

ahmednagar news
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांच्या ईडी चौकशीत नेमकं काय झालं ?

दरम्यान, श्रावणी शनिवारी निमित्त आज पुण्यातील गोल्डनमॅन तरुणांनी शनि मंदिरात उपस्थिती दर्शवली. गळ्यात काही किलोचे सोन्याचे दागिने, हातात आणि पायात घालून गोल्डनमॅनला पाहण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केली. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी हजारो युवकांनी मंदिर आवारात मोठी गर्दी केली. त्यामुळे यांनी मंदिरातून काढता पाय घेतला. त्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत त्यांची सोनेरी रंगाची ऑडी कार आणायला त्यांना फार कसरत करावी लागली. खाजगी व देवस्थानच्या सुरक्षा विभागाने त्यांना कसातरी मार्ग काढून दिला. तरी या गोल्डनमॅन तरुणांचे चाहते शिवाजंली चौकापर्यंत वाहनाच्या पाठीमागे पळत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com