Video : खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला मजुराचा ५ वर्षांचा चिमुकला; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यामुळे कोपर्डी परिसरात खळबळ उडाली आहे
Ahmednagar news
Ahmednagar news Saam tv

सुशील थोरात

अहमदरनगर : अहमदनगरमधून मोठी घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या कोपर्डी येथे ऊसतोड मजुराचा लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे. सागर बारेला असं बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचं नाव असून त्याचं वय साधारण पाच वर्षे आहे. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यामुळे कोपर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ऊसतोड मजुराचा ५ वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे. सागर बारेला असे मुलाचे नाव आहे.मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यामुळे कोपर्डीतील ग्रामस्थ बोअरवेल जवळ एकत्र झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बुऱ्हानपूर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर कारखान्यात ऊस तोडणीसाठी आलेले आहेत. यातील बुधाजी बारेला या ऊसतोड मजुराचा पाच वर्षाचा सागर नावाचा मुलगा आहे.

सागर हा सायंकाळच्या सुमारास कोपर्डी येथे खेळत असताना हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे. सहा वाजेपासून त्या मुलाला काढण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

Ahmednagar news
Crime News: महाराष्ट्र हादरला! भर रस्त्यात नगरसेवकाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण उघड

युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोरमध्ये पडलेल्या पाच वर्षीय मुलाला काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासन कोपर्डी येथे तळ ठोकून आहेत.

ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने बोरवेलच्या आसपास असणाऱ्या परिसरामध्ये खड्डा खोदून मुलाला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com