‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

मिस्टर एशिया किताब पटकवणाऱ्या अहमदनगर मधील तरुणाचा मृत्यू
‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ
‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळSaam Tv

अहमदनगर : मिस्टर एशिया किताब पटकवणाऱ्या अहमदनगर मधील तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सर्वात धक्कादायक विषय म्हणजे मिस्टर एशिया किताब पटकवणाऱ्या अजिंक्य गायकवाड याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना त्याच्या घरीच घडल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

घरात टीव्ही केबल मधील वीज प्रवाह उतरल्यामुळे वीजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यावेळी वीजेचा धक्का लागल्यामुळे अनर्थ घडला आहे. विजेचा धक्का बसून, त्याचा मृत्यू झाला आहे.

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ
तरुणाच्या जळत्या चितेवर दिसली काळी कोंबडी, लिंबू अन् बाहुली!

अजिंक्य गायकवाडच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर खूप मोठे दु:खाचा डोंगर कोसळले आहे. अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता. २०१९ मध्ये त्याने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवार बरोबरच अजिंक्यचे मित्र आणि फॉलोवर्स यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com