Ahmednagar Clash: हिंसाचारानंतर शेवगावात तणावपूर्ण शांतता; व्यापारी, ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Two Groups Clash in Shevgaon: न्यायालयाने घटनेतील सर्व आरोपींना प्लीज कस्टर्डमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Ahmednagar Clash
Ahmednagar Clashsaam tv

>> सुशील थोरात, साम टीव्ही

Clash in Shevgaon : अहमदनगरमधील शेवगावमध्ये रविवारी रात्री दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत 31 आरोपींना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर सर्व आरोपींना प्लीज कस्टर्डमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर शहराची शांतता बिघडली असल्याने संतप्त व्यापारी आणि ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज 10 वाजता शेवगावमध्ये व्यापारी ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निषेध सभा ठेवण्यात आली असून या घटनेतील सर्व आरोपींना जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagar Clash
Nagpur News: अकोल्यातील घटनेनंतर नागपुरात हायअलर्ट, शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

रविवारी रात्री अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. मोठ्य प्रमाणात जमलेल्या जमावाने यावेळी काही गाड्यांची तोडफोट आणि जाळपोळ केल्याचा प्रकार देखील घडला होता.

या घटनेत काही लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीचा कट लागल्याचं कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. (Latest Breaking News)

Ahmednagar Clash
Dombivli Crime: बायकोकडे दारू पिण्यास पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याने केले भयंकर कृत्य

या घटनेत दगडफेक करणाऱ्या 250 ते 300 जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सध्या शेवगावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com