Ahmednagar Crime: 25 जणांच्या टोळक्याकडून तलवार, लोखंडी रॉडने कुटुंबावर हल्ला, दोघे गंभीर जखमी

25 जणांकडून एका कुटुंबातील लोकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Ahmednagar Crime
Ahmednagar CrimeSaam Tv

अहमदनगर : अहमदनगरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे 25 जणांकडून एका कुटुंबातील लोकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे येथे पोलिसांचा धाकच नसल्याचं चित्र आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. (Ahmednagar Crime News Armed Attack On Family From 25 People Two Injured).

Ahmednagar Crime
Nagpur : कर्जबारीपणामुळे संपवलं कुटुंब; बायकोसह दोन मुलांची हत्या केली स्वतःही गळफास घेतला!

नेमकं काय घडलं?

पूर्वीच्या वादातून दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथील श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील बबन पिंपळे यांना औरंगाबाद (Aurangabad) येथील नातेवाईकांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर पिंपळे कुटुंबियाकडून धार्मिक जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त पिंपळे कुटुंबीयांच्या घरी धार्मिक कार्यक्रमात जेवण सुरु होते.

तितक्यात तेथे औरंगाबादहून 25 जण लाठ्या-काठ्या आणि तलवारी घेऊन आले. या लोकांनी पिंपळे कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

Ahmednagar Crime
Shocking Murder News Nagpur : तरुणाची हत्या करून मित्र पळाले, नागपूरच्या वाठोडा परिसरातली घटना

यावेळी तिथे महिला आणि लहान मुलंही उपस्थित होते. त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून आलेल्या या 25 जणांनी अचानक हल्ला केल्याने काही काळ परिसरात खळबळ माजली.

या सशस्त्र हल्ल्यात तलवार, लोखंडी रॉड, कुऱ्हाड, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये बबन पिंपळे, राजू चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com