Sangmner Fraud News: पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष; संगमनेरमधील तरुणांना २२ लाखांचा गंडा

Ahmednagar Sangmner Fraud News: या फसवणूक प्रकरणात पिंपरी चिंचवड येथील काही प्रतिष्ठित लोकांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
Fraud Case
Fraud CaseSaam tv

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Sangamner Fraud News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी देण्याच्या आमिषाने चौघांची फसवणूक केल्याचा धक्कादायक संगमनेर शहरातून समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील चौघांना तब्बल २२ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Fraud Case
Wardha News: धावत्या ट्रेनमध्ये प्रसुती कळा... अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ; रेल्वे प्रवासातच महिलेने दिला बाळाला जन्म

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpari Chinchwad) नोकरीस लाऊन देतो असे सांगून संगमनेर (Sangamner) तालुक्यातील चौघांची फसवणूक झाली आहे. या धक्कादायक प्रकाराने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील चार तरुणांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरुपी लीपिकाची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखण्यात आले. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी पाच- पाच लाख रुपये घेण्यात आले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी पोलिसांत धाव घेतली.

Fraud Case
Dombivli Politics : शिंदे गटासमोर भाजपचं काही चालत नाही; मनसे आमदार राजू पाटील यांनी डिवचलं

याप्रकरणी सतीश कुमार भालेराव, शिवदर्शन चव्हाण आणि विश्वजीत चव्हाण या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणूक प्रकरणात पिंपरी चिंचवड येथील काही प्रतिष्ठित लोकांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com