Ahmednagar Crime News: हक्काच्या पैशांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या

Kopargaon News : हक्काच्या पैश्यांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime NewsSaam tv

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहमदनगर) : काम केल्यानंतर हक्काचे मजुरीचे पैसे मागितल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. (Ahmednagar) चौघांनी लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने मजुराचा जीव गेला आहे. हा प्रकार कोपरगाव (Kopargaon News) तालुक्यातील येसगाव येथे घडला आहे. (Latest marathi News)

Ahmednagar Crime News
Sambhaji Bhide: CM शिंदे लबाड नाहीत, फडणवीसांच्या अंगी लुच्चेपणा नाही; संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंना काय सांगितलं?

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या हत्येच्या या घटनेने (Crime News) तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिपक दादा गांगुर्डे (वय ४०) असे मयत मजुराचे नाव असून या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. मयत दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पती दिपक गांगुर्डे याने आरोपी उषा पोळ, स्नेहा पोळ, राज उर्फ बबलू पोळ आणि अण्णा उर्फ अनिल गायकवाड (सर्व रा. येसगाव) यांच्याकडे गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. 

Ahmednagar Crime News
Nagpur News: दुध विक्रेत्यांना दणका... नागपुरात दुध भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध केले नष्ट

पैसे मागितल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी, लाकडी दांडा आणि दगडाने जबरी मारहाण केली. मयत दिपक याला कोपरगाव रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत तालुका (Police) पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com