अहमदनगर नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे; गोपीचंद पाडळकरांची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरणाचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSaam Tv

सांगली - हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' (Ahmednagar) नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr)यांनी केली आहे. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) म्हणजे संपूर्ण हिंदुस्तानाचे प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुगल निजामशाहीत हिंदू संस्कृतीवर हल्ले करत होते. मंदिर लुटली जात होती. त्यावेळेस अहिल्यादेवी मातेने या हिंदू संस्कृतीवर आपले प्राण फुकले. मंदिराचं पुनर्निर्माण केले.

स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. लोकहितांसाठी कुशल प्रशासनाच्या वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे. त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे असे गोपीचंद पडळकर म्हणले.

हे देखील पाहा -

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये.तरी या हिंदुस्तानच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे.

Gopichand Padalkar
Crime: धक्कादायक! विवाहितेने भावाला केला गुडबायचा मॅसेज अन् उचलले टोकाचे पाऊल

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी तमाम अहिल्यादेवी प्रेमींची लोकभावना आहे. असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावे असणारा हिंदुस्थानातला पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असणार आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरणाचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com