कार पेटली की पेटवली?; नगर– औरंगाबाद महामार्गावरील थरारक घटना

नगर– औरंगाबाद महामार्गावर कारला आग; तरूण गंभीर जखमी
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यात माळीचिंचोरा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेली महागडी एक्‍सयुव्‍ही गाडी पेटली. रस्त्याने जाणा-या वाहन चालकांनी याबाबतची माहिती नेवासा पोलिसांना (Police) दिल्यावर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गाडीत चालक असल्याचे लक्षात आले. मात्र तो गंभीर भाजलेल्या अवस्थेत असल्याने त्याला तत्काळ बाहेर काढत नगर येथील खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. (Car fire on Nagar-Aurangabad highway)

Ahmednagar News
Nandurbar: नागन नदीवरील पर्यायी पूल दोनच दिवसात गेला वाहून; दहा गावांना फटका

सदर कार रस्त्याच्या कडेला अर्धा तास उभी होती. गाडीत चालक बसलेला होता; असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता, गंभीर भाजलेल्या युवकाचे नाव लंकेश चितळकर (वय 22, रा. दहिगाव साकत. ता. नगर) असल्याचे समजले.

युवक गाडी घेऊन होता गायब

पोलिसांनी याबाबत त्याच्या कुटूंबियांशी संपर्क साधला असता तो काल रात्रीपासून गाडी घेऊन घरातून गायब होता. मात्र गाडी उभी करून पेटली कशी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जखमी लंकेशचा घरगुती वाद होता का? किंवा हा अपघात (Accident) की घातपात या प्रश्नांची उकल मात्र पोलिस तपासानंतरच होऊ शकेल. परिसरातील नागरिकांनी मात्र गाडीला आतून आग लागल्याचे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com