Ahmednagar News: ड्युटीवरून घरी गेल्‍या अन्‌ महिला पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. अर्चना रावसाहेब कासार असे मयत महिला पोलिसाचे (Police) नाव आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Letest Marathi News)

अहमदनगर (Ahmednagar) पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात अर्चना कासार या कार्यरत होत्‍या. शनिवारी रात्री त्यांची ड्युटी संपवून रविवारी सकाळी त्या अहमदनगर शहरातील बोल्हेगाव उपनगरात असलेल्या घरी गेल्या. मात्र काही वेळानंतर घरातील त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेऊन दरवाजा उघडला असता अर्चना कासार या गळाफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या होत्या.

या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि त्यांच्या पथकाने तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मात्र त्याआधीच अर्चना कासार मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Ahmednagar News
Nandurbar Accident News: झोपेच्‍या डुलकीत घाटात अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्‍यू, एक जखमी

सुसाईड नोटमध्‍ये काय?

अर्चना कासार यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंप तत्त्वावर त्या जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झाल्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असून घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट मिळाली असल्याची कुजबूज सुरू असून त्याबाबत पोलीस प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com