Ahmednagar: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

पिचड-लहामटे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam Tv

सचिन बनसोडे

अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आज ४५ ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी बघायला मिळतेय. आजी-माजी आमदारांचे गाव असलेल्या राजूर गावात दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला असून दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी पिचड आणि लहामटे यांनी विकास कामांवरून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

अकोले तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये. भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे (NCP) विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचे मूळ गाव असलेल्या राजूरमध्ये सोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांनीही सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पिचड आणि लहामटे समोरासमोर आले मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितले देखील नाही.

हे देखील पाहा -

यावेळी राजूरकरांनी दहशतवाद गडायचं ठरवलं असून गावात यापुढे लोकशाही नांदणार आहे. २०१९ मध्ये जसे विधानसभेला परिवर्तन झाले तसेच राजूर ग्रामपंचायतीत होणार. गावातील मूलभूत प्रश्न सोडवले जातील. ४० वर्षाच्या‌ सत्तेत पिचडांना काही करता आले नाही. अशी टीका करत आमदार लहामटे यांनी माझे गाव म्हणून मला याठिकाणी भरपूर कामे करायची आल्याचे म्हंटले आहे.

Ahmednagar News
Nandurbar News: तब्बल ४७ दिवसांनंतर विवाहितेवर अंत्यसंस्कार; मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे वडिलांनी उभारला लढा

लहामटेंच्या आरोपांनंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी देखील पलटवार लहामटेंना प्रतिउत्तर दिले आहे. लहामटे यांनी तालुक्याचे नेतृत्व करताना कोणती विकासकामे केलीत ते सांगाव ? साधा एक बंधारा देखील त्यांना बांधता आला नाही. सर्व पाणीयोजना या केंद्राच्या जलजिवन मिशन अंतर्गत झाल्या असून अडीच वर्षात मतदारसंघात आमदारांचे शुन्य काम असल्याची टीका पिचड यांनी केली आहे.

दरम्यान संततधार पाऊस सुरू असल्याने मतदान प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याचे बघायला मिळतेय. मात्र पावसामुळे आजी-माजी आमदारांच्या गावातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि चिखलातून वाट काढणारे मतदार, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com