Ahmednagar News: अपघाताचा बनाव करत ३० लाखाच्या लसूणची परस्पर विक्री; चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar News : अपघाताचा बनाव करत ३० लाखाच्या लसूणची परस्पर विक्री; चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : खरेदी केलेला ३० लाखांचा लसूण ट्रक चालकाने परस्पर विकून टाकला. यानंतर चालकाने ट्रकचा अपघात (Accident) झाल्याचा बनाव केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर (Ahmednagar) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Maharashtra News)

Ahmednagar News
Jalgaon News : सैन्यदल भरतीत अपयश; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

गुजरात येथील एस एस ट्रेडिंग कंपनीने गुजरात येथीलच सिद्दीकी ब्रदर्स यांच्याकडून २२ हजार १६० किलो वजनाचा तब्बल ३० लाख रुपयांचा लसूण (Garlic) खरेदी केला होता. दरम्यान खरेदी केलेला लसूण मध्यप्रदेश येथून बैंगलोर येथे मोदी रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून पाठविण्यात आला होता. मात्र ट्रान्सपोर्टवाल्याने ट्रकमधून पाठविलेला लसणाचा ट्रकचा अहमदनगर जिल्ह्यातील साकत शिवारात अपघात झाल्याचा बनाव चालकाने करत सर्व लसूण एका मध्यस्थीमार्फत परस्पर विक्री केली होती. दरम्यान या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ahmednagar News
Farmer Success Story: अकोल्यात गावरान अंडीचा 'VLE' ब्रँड; महिन्याला ९० हजाराची उलाढाल

तीनजण पोलिसांच्या ताब्यात 
घडलेला प्रकार आणि त्याची रक्कम मोठी असल्याने याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चक्रे फिरवत आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सवरलाल अंबालाल जाट आणि रविकांत काळुराम सेन व रामदास तुकाराम बोलकर या तिघांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com