Radhakrishna Vikhe Patil on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
Radhakrishna Vikhe Patil on NCP
Radhakrishna Vikhe Patil on NCPsaam tv

>> सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री पदाबाबत जयंत पाटलांनी केलेलं वक्तव्य म्हणजे आपल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. मात्र आम्ही २०२४ च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असून पुन्हा युतीचे सरकार येणार आहे.

Radhakrishna Vikhe Patil on NCP
Accident Viral Video: आधी उडाली, मग उलटली; मात्र इतक्या भीषण अपघातातून चालक वाचला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

मविआमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त झाली असून महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, याची त्यांनी चिंता करावी, आस टोलाही विखे पाटलांनी जयंत पाटलांना लगावला आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

तत्पूर्वी अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा आहे, असं म्हटलं होत.

तसेच काँग्रेसचे मोठे नेते महाबळेश्वरमध्ये शिंदेंना भेटले अशीही चर्चा असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार फुटतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

Radhakrishna Vikhe Patil on NCP
Rahata APMC Election Result: विखे पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल, थोरातांना धोबीपछाड देत राहाता बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व

उदय सामानात यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनीही त्यांना टोला लगावत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात, तसं एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटं नाही."

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com