थरारक! पुराच्या पाण्यात पिकअप गेली वाहून; चालकासह २ जण बुडाल्याचा अंदाज

सदरील घटना संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर घडली.
sangamner pickup News
sangamner pickup NewsSaam TV

मोबीन खान, साम टीव्ही

संगमनेर : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. सततच्या मुळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. अशातच अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. मालवाहू करणारी पिकअप प्रवरा नदी पात्रात वाहून गेली. या पिकअप वाहनात 3 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Ahmadnagar Sangamner Latest News)

sangamner pickup News
Milk Rate : दुधाच्या दरात पुन्हा वाढ; किती रुपयांनी महागलं दूध? वाचा...

सदरील घटना सोमवारी (१५ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर घडली. विशेष म्हणजे पुलाला कुठल्याही प्रकारचे संरक्षक कठडे नव्हते. आज सकाळी दूध टाकायला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून प्रवरा नदीला पूर आला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच सोमवारी रात्री नाशिक येथून निघालेली पिकअप संगमनेर तालुक्यातील ओझर येथे काचा घेऊन आली होती. काचा खाली करून जात असताना पुलावरून नदीपात्रात पडून पिकअप पुराच्या पाण्यात वाहून गेली. (Sangamner Todays News)

या पिकअप वाहनात चालकासह दोन जण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सकाळी दुध घालण्यासाठी चाललेल्या शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आता वाहून गेलेल्या पिकअपसह गाडीमधील तीन व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.

प्रवरा नदीला पूर असल्यानं रेस्क्यू करण्यात अडचणी येत आहेत. धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. नदीवरील हा पुल अतीशय धोकादायक झाला असून कठडे नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com