Ahmednagar: सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळले

३ तारखेला पहाटे आरती घरातून बेपत्ता झाली होती
Ahmednagar: सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळले
Ahmednagar: सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळलेSaam Tv

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यामधील खैरी निमगाव येथील गावानजीक असलेल्या तलावामध्ये गावातीलच बेपत्ता झालेल्या अल्पवयीन 14 वर्षीय आरती शिवाजी झिंजुर्डे या अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ३ तारखेला पहाटे आरती घरातून बेपत्ता झाली होती.

हे देखील पहा-

तिच्या आई- वडिलांनी सर्वत्र शोधाशोध करून देखील ती सापडली नाही. त्यानंतर हरवल्याची नोंद श्रीरामपूर पोलिसात दिली होती. ७ दिवसानंतर चारा घेण्यासाठी गेलेल्या तरुणांना तलावातील पाण्यात काटेरी झुडपात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत इतरांना सांगितले ही माहिती गावात वार्‍यासारखी पसरली घटनास्थळी मोठी गर्दी देखील झाली होती.

Ahmednagar: सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळले
Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी लालपरी सज्ज

मृतदेहाची अवस्था पाण्यामुळे अतिशय खराब होऊन प्रचंड दुर्गंधी येत होती. मूर्ती पाण्यातून काढल्यानंतर गावातीलच आरती झिंजुर्डेचा असल्याचे निदर्शनात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, आरतीचा मृत्यु का? आणि कशामुळे झाला याचा शोध पोलीस करत आहेत. दुर्दैवी घटनेमुळे गावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.