नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!

पीडित महिला घरी एकटी होती. या महिलेला घरात एकटं पाहून सदर चार आरोपी जबरदस्तीने तिच्या घरात घुसले. पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
नगरमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार!
नगरमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार!SaamTvnews

अहमदनगर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेईनात. नेवासा तालुक्यातील रामडोह या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रामडोह मधील एका विवाहित महिलेवर चार नराधमांनी दोन वेळा सामूहिक अत्याचार (gang rape) केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी सदर पीडित विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर क्रूरतापूर्वक अत्याचार केला आहे. पहिल्यांदा असा प्रकार घडला तेव्हा पीडितेने घाबरून तक्रार दिली नव्हती. मात्र, आरोपींनी दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नराधमांविरोधात सामूहिक बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल केला आहे.

शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेष काकासाहेब गोरे, संतोष अप्पासाहेब गढेकर आणि संदीप गोरख आगळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या घटनेत पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन महिन्यापूर्वी सदर विवाहित महिलेचे पती, मुली आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान पीडित महिला घरी एकटी होती. या महिलेला घरात एकटं पाहून सदर चार आरोपी जबरदस्तीने तिच्या घरात घुसले. पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेनं घाबरून आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन केला.

नगरमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार!
विनाशकाले विपरीत बुद्धी! पैशांच्या वाटपावरून दरोडेखोरांचा वाद; एक झाला फितूर

जेव्हा पीडित महिला आपल्या माहेरी गेली तेव्हा या नराधमांनी तिला फोन करून धमकी दिली होती. त्यामुळे हा प्रकार पीडित महिलेच्या घरी देखील समजला होता. यानंतर, आठ दिवसांपूर्वी पीडित महिला शेतात कामानिमित्त गेली होती. व एकटी झोपली असताना आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडित विवाहितेने अखेर या नराधमांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संबंधित चारही आरोपीविरोधात सामूहिक बलात्कार, ब्लॅकमेल, जीवे मारण्याची धमकी, अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com