अजित पवारांनी कायद्याची बाजू ऐकून न घेता पदोन्नतीचे आरक्षण रद्द केले; गोपिचंद पडळकरांचा आरोप

संविधानिक आरक्षण असताना राज्य सरकारने आकस बुद्धीने भटक्या विमुक्त जातींवर अन्याय केला.
अजित पवारांनी कायद्याची बाजू ऐकून न घेता पदोन्नतीचे आरक्षण रद्द केले; गोपिचंद पडळकरांचा आरोप
गोपिचंद पडळकरांचा आरोपSaamTV

सातारा - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी आज सातारा Satara जिल्हाधिकारी कार्यालयात भटके-विमुक्त आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना पदोन्नतीचे आरक्षण मिळावं या मागणीचे निवेदन दिले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यावर निशाणा साधला अजित पवारांनी कायद्याची कोणतीही बाजू ऐकून न घेता भटके-विमुक्त आघाडीचे आरक्षण रद्द केला असल्याचा आरोप पडळकरांनी अजित पवारांवर केला आहे. (Ajit Pawar canceled the promotion reservation without listening to the side of the law- Gopichand Padalkar)

हे देखील पहा -

सुप्रिम कोर्टातील Supreme Court याचिकेचा निर्णय यायच्या आधी राज्य सरकारने गठीत केलेल्या समितेचे अध्यक्ष असणारे अजित पवारांनी हे आरक्षण रद्द केलं आणि त्यांनी वयाच्या सेवा जेष्ठतेनुसार आरक्षण Reservation लागू केल्याचही ते म्हणाले. भाजप भटके विमुक्त आघाडी तर्फे प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देत असल्याच पडळकरांनी यावेळी सांगितलं तसेच 2004 पासून संविधानिक आरक्षण असताना राज्य सरकारने 7 मे आरक्षण रद्द केलं ते या सरकारने आकस बुद्धीने भटक्या विमुक्त जातींवर अन्याय केला असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ हे सक्षम

गोपिचंद पडळकरांचा आरोप
राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा; अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

लखीमपुर प्रकरणा चा तपास सुप्रीम कोर्टाच्या होत देखरेखी खाली होत असून यामध्ये उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सक्षम आहेत. महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कडे लक्ष द्यावे. असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.