Ajit Pawar In Kolhapur : आत्मचिंतन करा अन्यथा, तुम्हांलाही जनता दाखवून देईल : अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला (पाहा व्हिडिओ)

काेल्हापूरातील एका हाॅटेलच्या उदघाटनास अजित पवार आले हाेते.
ajit pawar जगात भारी कोल्हापुरी आहे तर ते विकासात ही दाखवा
ajit pawar जगात भारी कोल्हापुरी आहे तर ते विकासात ही दाखवा saam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : गद्दार, पन्नास खाेके हे शब्द जनतेला पटलेला आहे. त्यासंदर्भात त्यांना आत्मचिंतन केले पाहिजे असा टाेला विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटाला काेल्हापूरात (kolhapur) टाेला लगावला आहे. आम्ही काम करत असताना राज्याला योग्य पद्धतीने पुढे नेत होतो परंतु आत्ताचे सरकार विकासकामांना अडथळा आणत आहे अशा तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. सरकार येतात, सरकार जातात मात्र सत्तेची मस्ती येऊ देऊ नका. कर्नाटकात काय झालं माहित आहे ना असा इशारा पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. (Maharashtra News)

ajit pawar जगात भारी कोल्हापुरी आहे तर ते विकासात ही दाखवा
Maharashtra News : निर्णय झाला, वितरण कधी ? शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रंग - एक गणवेश

काेल्हापूरातील एका हाॅटेलच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार हे उपस्थितांसमाेर बाेलत हाेते. पवार म्हणाले राज्यात का जातीय दंगली होत आहेत त्याचा विचार करावा लागेल. जनतेचे महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न यावरील लक्ष वळवण्यासाठी काही राज्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

लोकांचं लक्ष्य विचलित केलं जातं आहे. मंदिरात हाफ पॅन्ट घालायची नाही असलं काहीही सुरू आहे. आम्ही अजमेरला पण चादर चढवतो असे पवार यांनी नमूद केले. लोकांमध्ये जातीय सलोखा असला पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले.

ajit pawar जगात भारी कोल्हापुरी आहे तर ते विकासात ही दाखवा
Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP च्या तिस-या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

जनता सर्व पाहत आहे

पवार म्हणाले सध्याचे राज्यकर्ते विकासकामांना खीळ घालत असल्याची तक्रार येत आहे. खरं तर लोकांना विश्वास असला पाहिजे हे सरकार आपलं आहे. आपल्या शहराचा, जिल्ह्याचा विकास हाेणार याची त्यांना शाश्वती वाटली पाहिजे. आम्ही काम करत असताना राज्याला योग्य पद्धतीने पुढे नेत होतो. परंतु तुम्ही काय करीत आहात हे जनता पाहत आहे.

ajit pawar जगात भारी कोल्हापुरी आहे तर ते विकासात ही दाखवा
Udayanraje Bhosale News : तुम्हांला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही : उदयनराजे भाेसले

...त्यावेळी मी कोणाचे काम अडवलं नाही

पवार म्हणाले आज मंत्री म्हणतात शिंदे गटाचे आमदार कोणावर काम होऊ द्यायचे नाही म्हणतात हे फार वाईट आहे. मुद्दाम प्रकल्प थांबवले जातात हे काही बरोबर नाही. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक राजकारणात विकास मागे पडला अशी खंत व्यक्त केली जात आहे. मी एक्ससाईज मिनिस्टर होतो त्यावेळी कोणाचे काम अडवलं नाही असेही पवार यांनी म्हटलं.

सत्तेची मस्ती येऊ देऊ नका

सरकार येतात, सरकार जातात मात्र सत्तेची मस्ती येऊ देऊ नका. विकासाची कामे थांबवू नाका विरोधकांची कामे करा अन्यथा जनता दाखवून देईल. कर्नाटकात काय झाले ते पाहावे, कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही असेही अजित पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com