सातारा सैनिक स्कूलला ३०० कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.
सातारा सैनिक स्कूलला ३०० कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार
ajit pawar bhoomipoojan of satara government rest house

सातारा : सातारा जिल्हा दाै-यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. जेथे निधी कमी पडेल अशी शक्यता वाटते त्याचे प्रस्ताव प्रशासनाने तातडीने पाठवावेत. त्यासाठी पालकमंत्री आणि अन्य लाेकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.

सातारा (satara) येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil), खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.

विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल

यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सातारा येथे १३ कोटी १२ लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. एक व्हीव्हीआयपी कक्ष, २ व्हीआयपी कक्ष व ५ साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहे. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.

सैनिक स्कूलला ३०० कोटी

सैनिक स्कूल हे (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी १०० कोटी या प्रमाणे ३०० कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वैद्यकीय महाविद्यालयास निधी कमी पडू देणार नाही

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

ajit pawar bhoomipoojan of satara government rest house
राणेंचे अभिनंदन करीत जूना किस्सा सांगून अजित पवारांनी काढला चिमटा

प्रयोगशाळा उभारणीला १२ कोटी ९९ लाख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला १२ कोटी ९९ लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.