Ajit Pawar : दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत संतापले

Maharashtra News: अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar in Assembl
Ajit Pawar in Assemblsaam tv

Ajit Pawar in Assembly : राज्यात दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून भेसळ करणाऱ्यांचं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी अशी मागणी विरोधी पत्रनेते अजित पवार यांनी केली 'आहे.

Ajit Pawar in Assembl
Shashikant Warishe: मोठी बातमी! पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; विधानपरिषदेत सरकारची कबुली

'पावडर एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी'

ते म्हणाले, दूध भेसळ करुन लहानग्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. (Latest Marathi News)

परंतु राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही. मात्र दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी. याशिवाय दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन ती एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील - पवार

अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबात राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पीकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्याला यलो ॲलर्ट दिला आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत.

Ajit Pawar in Assembl
H3N2 Outbreak: पुणेकरांनो काळजी घ्या! मार्चमध्ये शहरात आढळले H3N2 विषाणूचे 46 रुग्ण, एकाचा मृत्यू

राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्यानं तिहेरी संकटात सापडला आहे.

'कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताहेत'

आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर ११ जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट मिळाला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीनं शेतीचं फार नुकसान झालेलं नाही’ अशी वक्तव्यं करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com