Ajit Pawar : कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रविरोधी गरळ ओकणं बंद करावं; विधानसभेत अजित पवार संतापले

केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांना समज देण्याची गरज; अजित पवार यांची विधानसभेत मागणी
ajit pawar news
ajit pawar news saam tv

मुंबई - कर्नाटकचे मंत्री, आमदार सातत्यानं महाराष्ट्रविरोधी गरळ ओकण्याचं काम सुरु असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे उपस्थित केला.

मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा," अशा प्रकारची वादग्रस्त करुन कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला.

ajit pawar news
TET Scam : टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा

राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांच्या संतप्त भावना आणि तीव्र नाराजी कर्नाटक सरकारला कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही कर्नाटकला समज देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधानसभेत विषय उपस्थित करुन कर्नाटकचे मंत्री आणि आमदारांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईमध्ये कन्नड भाषिकंच नव्हे तर विविध प्रांतातून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाला विनाकारण वेगळं रुप देण्याचा प्रयत्न करत आहे.

ajit pawar news
Abdul Sattar : गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांचं विधानसभेत स्पष्टीकरण; म्हणाले..,

मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा, अशी प्रकारची त्यांची वक्तव्ये सहन करता येणार नाहीत. मी त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक सरकारला तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या तीव्र भावना कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटक सरकारला समज देण्याबाबत कळवण्यात यावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com