
अजित पवार गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. अजित पवार गट त्यांच्या मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक काढणार असल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून पक्ष संघटनेत मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यानंतर अजित पवार गटाने पक्षवाढीसाठी नवी रणनीती आखल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)
अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि ९ मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर काही जिल्हे नेमून देण्यात आले. पक्ष वाढवण्यासाठी ९ मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्री आपल्या जिल्ह्यात जातच नाहीत, असा कार्यकर्त्यांचा सूर होता. तसेच मंत्र्यांवर जबाबदारी देऊन महिना उलटला, तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.
पक्षातील वरिष्ठांनी अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांकडून कामकाजाचा अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मंत्र्यांना खात्यांची आणि पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षबांधणी आणि प्रगतीपुस्तकाचा संबंध काय?
आगामी काळात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होणा आहेत. त्यामुळं सर्वच पक्ष जोमानं कामाला लागलेत. त्यानुसार कामाचा सपाटा लावलेल्या अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगस्तीपुस्तक काढण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. ज्या मंत्र्यांनी काम केली आहेत. त्यांचं नाव या प्रगती पुस्तकावर येणार आहे. मग कोणत्या मंत्र्यांनी कोणतं काम केलंय? याची सर्व माहिती प्रगती पुस्तकातून समोर येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवार - पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर
धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड, व जालना
संजय बनसोडे - हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद
अदिती तटकरे - रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर
अनिल पाटील - जळगाव, धुळे, व नंदुरबार
धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
प्रफुल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, नागपूर
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.